¡Sorpréndeme!

Latets International News | भारत इस्रायल यांच्यात झाले महत्त्वाचे ९ करार | Lokmat News

2021-09-13 31 Dailymotion

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले असून सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नऊ महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केल्या. सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील सहकार्य करारांचा यात समावेश आहे. माझे मित्र नरेंद्र असा एकेरी उल्लेख करून नेतान्याहू यांनी मोदींसोबत च्या मैत्रीपूर्ण संबंधांची पावती दिली.ज्यू लोकांना भारतात नेहमीच प्रेम आणि आदर मिळाला असे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेची सुरुवात हिब्रू भाषेतून करून मोदी यांनी नेतान्याहू यांचे स्वागत केले.दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्टअप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकी बाबत सहमती झाली आहे. आता आगामी काळात दोन्ही देश एकमेकांच्या विकासा साठी आणि जनतेसाठी एकत्र येऊन काम करतील, अशी मी आशा करतो, असे मोदी म्हणाले.इस्रायलमधील अनेक कंपन्यांना मी भारतात शस्त्रास्त्र निर्मिती करण्याची विनंती केली आहे, असे सांगून मोदी म्हणाले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews